ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीजने गतविजेत्या बेलारूसच्या अरायना सबालेंकाचा ६-३, २-६, ७-५ असा पराभव करत आपल्या पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे सबालेंकाचं ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या सलग तिसऱ्या ऐतिहासिक विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.
या स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत गतविजेत्या आणि प्रथम मानांकित इटलीच्या जॅन्निक सिन्नेरचा सामना उद्या द्वितीय मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होणार आहे. महिला दुहेरीत जेलेना ऑस्टापेन्को आणि हसीएह सु वेई जोडीची लढत उद्याच टेलर टाउन सेन्ड आणि कॅटरिना सिनिआ कोव्हा जोडीबरोबर होणार आहे.