मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते आज भोपाळमध्ये 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या मंत्रातूनही याचीच प्रचिती येते, असं ते म्हणाले. त्यांनी याप्रसंगी वराह मिहीर खगोलीय वेधशाळेच्या स्वयंचलीत प्रणालीचं उद्घाटनही केलं.
बालकांमध्ये विज्ञानाची गोडी उत्पन्न झाली, तर विकसित भारत लवकर घडून येईल, असं केंद्रीय विज्ञान -तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात सांगितलं.