मध्यप्रदेशातल्या सतना इथं आज पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त मिनी ट्रक भाविकांना प्रयागराज इथं कुंभमेळ्याला घेऊन जात होती.
अपघात झाल्यानंतर सतना – चित्रकुट रस्त्यावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.