मध्य प्रदेशात, सागर जिल्ह्यातल्या शहापूर इथं आज सकाळी धार्मिक उत्सवादरम्यान हर्दूल बाबा मंदिराची भींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. भिंतीखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
Site Admin | August 4, 2024 8:05 PM | attack | Madhya Pradesh
मध्य प्रदेशात मंदिराची भींत कोसळून ९ लहान मुलांचा मृत्यू
