मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या जोडीनं सु यिन हुई आणि वु लुओ या तैवानी जोडीचा २१-१२, २१-१७ असा सरळ गेममधे पराभव केला. या दोघीही उद्या उपांत्य सामन्यात सिह पेई शान आणि हंग एन झु या दुसऱ्या एका तैवानी जोडीशी लढत देतील.
Site Admin | September 27, 2024 3:20 PM | Macau Open Badminton
मकाऊ ओपन बॅडमिंटन : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीची उपांत्य फेरीत धडक
