प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देश-विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा ११९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, NEWS ON AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲप वर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. रात्री ८ वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीवरुन प्रसारित होईल.
Site Admin | February 23, 2025 1:01 PM | Maan ki Baat
प्रधानमंत्री आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार
