प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 11 वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे.
हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरून प्रसारित केला जाणार आहे. त्याशिवाय हा कार्यक्रम एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.