डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी बैठक चेन्नईत सुरु

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं होत आहे. आपला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय्य व्हावी, अशी आपली मागणी असल्याचं स्टालिन म्हणाले.

 

मतदारसंघांची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर झाल्यास लोकसंख्या नियंत्रण यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांवर अन्याय होईल, असं ते म्हणाले. पुनर्रचना करताना देशाच्या विविधतेचं रक्षण व्हायला हवं, अशी भूमिका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मांडली.

 

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. दरम्यान, ही सर्वपक्षीय बैठक वृथा असल्याची टीका भाजपानं केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा