डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 25, 2024 7:59 PM

printer

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळेच शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता नांदत आहे – लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्र कुमार

लष्कर आणि इतर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं आणि झोकून देऊन केलेल्या प्रयत्नांमुळेच या भागात शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता नांदत आहे, असं प्रतिपादन लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्र कुमार यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल श्रीनगर इथं गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत चर्चा झाली. याचा सामना करण्यासाठीचं धोरण निश्चित केलं असल्याची माहितीही त्यांनी दिली. हिंसाचाराचं चक्र भेदणं, दहशतवाद्यांच्या यंत्रणा मोडून काढणं, तरुण आणि महिलांचं सक्षमीकरण, शिक्षण आणि खेळाला प्रोत्साहन देणं, तसंच या भागाच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं पुनरुज्जीवन करण्यावर भर देण्यात येत असल्याचंही सांगितलं. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी ७२० दहशतवाद्यांना ठार केल्याची माहितीही कुमार यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा