पंचायत से पार्लमेंट टू पॉईंट झीरो या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या संविधान सदनात झालं. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तसंच महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल बनवण्यासाठी पंचायती राज संस्था महत्त्वाची भूमिका निभावत आहेत असं बिरला यावेळी म्हणाले. महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचंही भाषण कार्यक्रमात झालं. केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजना पंचायती राज संस्थांशी निगडित महिलांमार्फत तळागाळात पोहोचत आहेत असं त्या म्हणाल्या. २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून पंचायती राज संस्थांमधल्या सुमारे ५०० महिला प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत.
Site Admin | January 6, 2025 3:45 PM | Panchayat Se Parliament 2.0