कौशल्याधारित उद्योगांसाठी देशभरात २०२ उत्कृष्टता केंद्र सुरु करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी दिली आहे. लोकसभेत आज ते एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. हस्तकलांवर आधारित उद्योगांना अधिक विस्तृत बाजारपेठ मिळवून देणं आणि त्या कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तयार करणं या उद्देशाने ही केंद्र स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं. पर्यावरण पूरक उद्योगांमधून रोजगारनिर्मितीसाठी एक क्षेत्र समर्पित असून प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमार्फत एक लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले.
Site Admin | December 2, 2024 6:37 PM | Jayant Chaudhary