अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने काल याची घोषणा केली.
ऑलिंपिकमध्ये २० षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ प्रत्येकी १५ खेळाडू खेळवू शकणार आहे. मात्र, अद्याप यासाठी स्टेडियमच्या नावांची यादी ठरवण्यात आलेली नाही.