डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात लुक आऊट नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. यात शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांचा समावेश आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाची पथकं देशाच्या विविध भागात रवाना झाली आहेत.

 

दरम्यान,या प्रकरणातला एक आरोपी गुरमेल याच्या हरियाणातील कथैल गावातही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशीसाठी गेले आहेत. तिथं त्याच्या मित्रांची सखोल चौकशी केली जात आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा