लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पुनर्रचनेसंदर्भात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली.
त्या पार्श्वभूमीवर सुळे बोलत होत्या. सामाजिक दृष्ट्या प्रगल्भता दाखवत दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात बाजी मारली आहे. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्या राज्यांना अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधित्व मिळेल. असं त्या म्हणाल्या. ‘एक देश – एक निवडणूक’ साठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोरही विरोधी पक्ष सदस्यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे, असं त्या म्हणाल्या.