लोकसभेत चालू आर्थिक वर्षातल्या पुरवणी मागण्या आणि मणिपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. ५१ हजार ४६२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारनं मांडल्या आहेत. या चर्चेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी भारत आणि अमेरिके दरम्यान कथित टॅरिफ युद्ध, असंघटित कामगार आणि मेक इन इंडिया यासारख्या विषयांवर सरकारला प्रश्न विचारले.
राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांनी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धीवर मत व्यक्त केलं. विद्यापीठांमध्ये दिली जाणारी JRF उशिरा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यापीठांकडून सरकार जीएसटी वसुली करते आहे, या आधी असं होत नव्हतं, असंही ते म्हणाले.