लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उझबेकिस्तानमध्ये आजपासून आयोजित आंतर-संसदीय संघाच्या दीडशेव्या बैठकीत सहभागी होणाऱ्या करणाऱ्या संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. सामाजिक विकास आणि न्याय यासाठी संसदीय कृती या विषयावर होणाऱ्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेला बिर्ला संबोधित करतील. या शिष्टमंडळात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश तसेच भर्तृहरी महताब, अनुराग सिंग ठाकूर, डॉ. सस्मित पात्रा, अशोक कुमार मित्तल, किरण चौधरी आणि लता वानखेडे या खासदारांचा समावेश आहे. तसंच हे खासदार आहेत. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यही सहभागी होतील. या भेटीदरम्यान, बिर्ला उझबेकिस्तानमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी आणि भारतीय विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.