जिनिव्हा इथं आयोजित आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीमध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होत आहे. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत चालणार असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आहे. ओम बिर्ला या आंतर संसदीय संघाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार असून याव्यतिरिक्त जिनिव्हा मधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधणार आहेत. तसंच यानिमित्तानं विविध देशांच्या संसद सदस्यांशी चर्चा करणार आहेत. भारताच्या प्रतिनिधिमंडळात राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंग, दोन्ही सभागृहांचे महासचिव आणि काही खासदारांचा समावेश आहे. यामध्ये १८० संसद सदस्य आणि १८ सहयोगी सदस्य आहेत.
Site Admin | October 13, 2024 7:20 PM | Geneva2024 | Om Birla Kota | SADC