भारताबाहेर वास्तव्य करणारे अनिवासी भारतीय देशाच्या विकास आणि आधुनिकीकरणाचे अविभाज्य भाग असल्याचं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. रशियात मॉस्को इथं ते भारतीय समुदायाला संबोधित करत होते. रशियानिवासी भारतीयांनी मायदेशाच्या राष्ट्रउभारणीत दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरव केला. रशिया- भारत संबंध परस्पर विश्वास आणि आदरभावने वर आधारित असल्याचं ते म्हणाले. ब्रिक्स देशांच्या संसदीय मंचाच्या १०व्या बैठकीसाठी भारतीय संसदेचं प्रतिनिधी मंडळ ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली रशियाला गेलं आहे.
Site Admin | July 14, 2024 6:14 PM
भारताबाहेर वास्तव्य करणारे अनिवासी भारतीय देशाच्या विकास आणि आधुनिकीकरणाचे अविभाज्य भाग – लोकसभेचे सभापती ओम बिर्ला
