लोकसभेत आज २०२४साठीच्या अर्थ विधेयकावरच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संध्याकाळी या चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वर्षीच्या अर्थंसंकल्पातली ध्येयं साध्य करण्यासाठी हे अर्थविधेयक मदत करेल, असा विश्वास या चर्चेदरम्यान भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे मुहम्मद हमदुल्ला सयीद यांनी अर्थ विधेयकाला विरोध केला. हे सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना करात अधिक सवलत देत असून सामान्य नागरिकांवरचा कर वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही चर्चा अद्याप सुरू आहे.
Site Admin | August 7, 2024 3:37 PM | 2024 | Finance Bill | Lok Sabha