डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमध्येही करण्यात येईल – ओम बिर्ला

लोकसभेच्या कामकाजाचा अनुवाद यापुढे डोगरी, बोडो, संस्कृत, उर्दू, मैथिली, मणिपुरी या भाषांमधेही करण्यात येईल, अशी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केली. आतापर्यंत हिंदी आणि इंग्रजीसह मराठी, बंगाली, मल्याळम, तमिळ आदी दहा भाषांमध्ये कामकाजाचा अनुवाद केला जात होता. एवढ्या सगळ्या भाषांमधे कामकाजाचं भाषांतर करणारी भारताची संसद ही जगातली एकमेव संसद असल्याचं बिर्ला यांनी सांगितलं.
२००२ मधे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७ लाख ७२ हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी दिली. लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या योजनेमुळे एक लाख ६३ हजार वस्त्या पक्क्या रस्त्यांनी जोडल्या गेल्या, असं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजारांहून अधिक वस्त्या रस्त्याने जोडण्याचं उद्दिष्ट आहे, असंही पासवान यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा