२०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे आठ अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचाही यात समावेश आहे. तसंच तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड मधील उमेदवारांनीही या अंतर्गत अर्ज केले आहेत.
आंध्र प्रदेश आणि ओडिशामधील राज्य विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भात देखील याच संदर्भात तीन अर्ज प्राप्त झाले आहेत. याचिका दाखल होऊन, त्याची पडताळणी झाल्यावर, चार आठवड्यांच्या आत मतदान यंत्रांची तपासणी सुरू होईल असं निवडणूक आयोगाने म्हंटलं आहे.