डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा

भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा करण्यात आली. विविध पक्षांच्या  खासदारांनी देशाच्या आतपर्यंतच्या वाटचालीवर  आणि संविधानाच्या महत्त्वावर आपले विचार मांडले. 

संसदीय  कार्यमंत्री किरेन रिजिजु यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संविधान निर्मितीतल्या योगदानाबद्दल कौतुकोद्गार काढले. संविधानानुसार देशातल्या प्रत्येक घटकाला समान अधिकार मिळाले. अल्पसंख्यकांबाबतही भेदभाव केला जात नाही, हे रिजिजु यानी अधोरेखित केलं. 

भाजपा संविधानाला कमकुवत करत आहे अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. गांधी यांनी बेरोजगारी, अग्नीवीर योजना, मक्तेदार भांडवलशाही, शेतकरी आणि महिलांवरील अत्याचार हे मुद्दे यावेळी उपस्थित केले. नरेंद्र  मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या  काळात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समता  नष्ट झाल्याचा आरोपही गांधी यांनी केला. 

भाजपाचे खासदार  अनुराग ठाकुर यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीची आठवण करून देत ठाकुर यांनी काँग्रेसवर टीका केली. 

द्रमुकचे खासदार ए राजा यांनी लोकशाही, कायदा, धर्मनिरपेक्षता आणि समता या संदर्भातले मुद्दे उपस्थित केले. यावेळी राजा यांनी सत्ताधारी पक्षावर कठोर शब्दात टीका केली. तर काँग्रेसने संविधानाच वापर काँग्रेसने मतपेढी वाढवण्यासाठी केल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. 

केंद्र सरकार आपल्या धोरणाद्वारे देशात आर्थिक असमतोल निर्माण करत असल्याचा आरोप भाकप एमएलचे खासदार राजा राम सिंह यांनी केला. तर भारतीय  संविधानात समाविष्ट असलेल्या मुल्यांची अंमलबजावणी झाली आहे की नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आरएसपीचे खासदार एन के प्रेमचंद्रन यांनी व्यक्त केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा