डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत आता एकाच तिकिटावर लोकल, बेस्ट, मेट्रो आणि मोनो प्रवास करता येणार

सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या दृष्टीनं मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा करताना ते बोलत होते.

 

या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ 300 ते 500 मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबईत सध्या 3,500 लोकल सेवा कार्यरत आहेत.

 

येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू करण्यासाठी 17 हजार 107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा