साहित्य अकादमीतर्फे साहित्योत्सव कार्यक्रमाचं आयोजन राजधानी नवी दिल्लीत केलं जात आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन ७ मार्चला होणार असून हा १२ मार्च पर्यंत चालेल. आशिया खंडातील हा सर्वात मोठा साहित्यिक कार्यक्रम आहे. या साहित्योत्सवाचं उद्घाटन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती साहित्य अकादमीचे सचिव डॉक्टर के. श्रीनिवास राव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Site Admin | March 5, 2025 8:26 PM
नवी दिल्लीत साहित्य अकादमीतर्फे साहित्योत्सव कार्यक्रमाचं आयोजन
