मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी अनामत रकमेसह प्राप्त १ लाख १३ हजार ८११ पात्र अर्जांची संगणकीय सोडत आज काढण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली.