फेंगल चक्रिवादळामुळे पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या दोन दिवसांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून वातावरण उष्ण आणि ढगाळ राहील अशी शक्यता आहे. या पावसामुळे काजू आणि आंबा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.