विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं आज अविश्वास प्रस्ताव सादर केला. सभापती राम शिंदे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात आला. शिवसेना पक्ष फुटीपूर्वी त्या उपसभापती झाल्या होत्या. त्यानंतर काही काळ त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होत्या. नंतर त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या. उपसभापतीपदी नियुक्ती झाली त्या सर्व आमदारांचा त्यांना पाठिंबा नसल्याचा दावा महाविकास आघाडीनं केला आहे. यापूर्वीच हा प्रस्ताव दाखल करायला हवा होता अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर दिली आहे.
Site Admin | March 5, 2025 7:25 PM | #nilam gorhe
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर
