आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या २५ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या यादीत आपलं नाव नसेल तर ते समाविष्ट करण्यासाठी मतदारांना ९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मतदार या कालावधीत यादीतल्या नावांमध्ये दुरुस्ती, पत्त्यामध्ये बदल, नाव वगळणीही करू शकतील. ९ ऑगस्टनंतर ही प्रारुप यादी अंतिम केली येईल आणि २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.