ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला म्हणजे एकप्रकारची राजकीय अशांतताच असून, अशांत परिस्थिती होऊ नये याची काळजी त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होत्या. पक्ष संघटना सोडून गेलेल्यामंध्ये, एकमेकांमध्येच हा संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी भाषिक जहरीपणा आणला जातो, तो चुकीचा आहे, असं त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी, तसंच महिला मेळाव्यासाठी त्या नाशिकमध्ये आल्या होत्या. महायुती सरकारमध्ये आगामी काळात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील, असा विश्वास गोऱ्हे यांनी व्यक्त केला.