अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं व्हिडिओ सामाईक करणाऱ्या टिकटॉक या मंचावर कालपासून राष्ट्रव्यापी निर्बंध घालण्याचा कायद्यावर शिक्कामोर्तब कऱण्यात आलं. चीनची मालकी असलेला हा मंच अमेरिकेतल्या उद्योजकाला विकेपर्यंत हे निर्बंध सुरू राहातील.
या अॅपच्या माध्यमातून दुष्प्रचार करणे आणि वापरकर्त्याच्या माहितीशी छेडछाड करण्यासाठी चीन याचा वापर करू शकते असं अमेरिकेच्या सभागृह सदस्यांनी न्यायालयात सांगितलं. या अॅपवर बंदी घालणाऱ्या भारतासह ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स आणि नेदरलँडस् सह अनेक देशांच्या रांगेत आता अमेरिकेचाही समावेश झाला आहे.