माजी मंत्री, भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. ढोबळे पक्षात आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षबांधणीसाठी होईल, असं सुळे यावेळी म्हणाल्या. तर आपण अजित पवार यांच्याशी मतभेद झाल्याने पक्ष सोडला होता, आता ते या पक्षात नसल्याने पुन्हा पक्षाशी जोडले गेल्याचं ढोबळे यांनी सांगितलं.
Site Admin | October 23, 2024 7:21 PM | Laxman Dhoble | Maharashtra Assembly Election 2024
भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
