माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपर्व वेबसाइट आणि ॲप चं उदघाटन केलं. ही वेबसाइट सर्वसामान्य जनतेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, बीटिंग रिट्रीट आणि टेबलॉक्स यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी संबंधित माहिती देईल. तसंच या ॲप वर एखाद्या कार्यक्रमाचं तिकीट, पार्किंग, आसन व्यवस्था यासंबंधीची माहितीही मिळेल, असं ते यावेळी म्हणाले.
Site Admin | December 25, 2024 2:14 PM | Launch of Rashtra Parva website and app