डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतीय नौदलाच्या विकसित भारत संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेला प्रारंभ

भारतीय नौदलानं काल आपल्या (थिंकक्यू) THINQ2024 या राष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा काल प्रारंभ केला. यावर्षीच्या स्पर्धेची मुख्य संकल्पना विकसित भारत अशी आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्याला शंभर वर्षं पूर्ण होईपर्यंत देशाचं विकसित भारतात रुपांतर करण्याच्या केंद्र सरकारच्या ध्येयाशी सुसंगत अशी ही संकल्पना आहे.

 

इयत्ता 9 वी ते 12 वीच्या देशभरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी संमिश्र पद्धतीनं चार टप्प्यांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांना THINQ2024 च्या – ‘www.indiannavythinq.in’ संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल. तसंच स्पर्धेची संपूर्ण माहितीदेखील याच संकेतस्थळावर घेता येईल.