भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ते सुरक्षा आणि महामार्गावरची गस्ती आणखी वाढवण्याच्या उद्देशाने महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे.
Site Admin | December 14, 2024 6:45 PM | NHAI