कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत, कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचं प्रभावी निवारण करणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ केला. कौटुंबिक निवृत्तीवेतन योजनेत करण्यात आलेल्या नव्या सुधारणा महिलांसाठी फायदेशीर ठरतील, असं जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं. पूर्वी घटस्फोटित मुली कौटुंबिक निवृत्तिवेतनासाठी अपात्र मानल्या जात होत्या. मात्र नव्या सुधारणांनुसार पुरावा म्हणून जनहित याचिका दाखल केल्यावर त्या पात्र ठरतील, अशी माहिती त्यांनी दिली.
Site Admin | July 1, 2024 8:10 PM | जितेंद्र सिंह | निवृत्तीवेतनधारक
कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचं प्रभावी निवारण करणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ
