देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग म्हणजेच DPIIT कडून भास्कर नावाच्या डिजीटल मंचाची सुरुवात करण्यात येणार आहे. भारत स्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री म्हणजेच भास्कर हा मंच उद्योजकीय परिसंस्थेतील प्रमुख भागधारकांमधलं सहकार्य केंद्रीकृत, सुव्यवस्थित आणि वृद्धींगत करण्याच्या उद्देशानं हा मंच स्थापन करण्यात आला आहे.
हा उपक्रम भारताला नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत कार्य करेल. यामुळे स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि इतर भागधारक यांच्यातली दरी कमी करुन सर्व क्षेत्रांमध्ये अखंड संवाद साधता येईल असं वाणिज्य आणि मंत्रालयानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.