हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून नागरीकांनी आपल्या घरावर तरंगा फडकावण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभाग घेऊन, घरावर तिरंगा फडकावण्याचा मान कुटुंबातल्या महिला सदस्यांना देण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात कळंब नगरपालिकेकडून हर घर तिरंगा अभियानांतर्गत काल गृहभेटीचं आयोजन करण्यत आलं होतं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं काल नगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरीकांना घरावर तिरंगा फडकावण्याचं आवाहन केलं. छत्रपती संभाजीनगर शहरात आज महापालिकेकडून हर घर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे, तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यता आलं आहे.