लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत लातूर पोलिसांनी औसा तालुक्यात एकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असून १५ जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. फेक स्पीच; तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणीही पाच गुन्हे दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
Site Admin | October 23, 2024 3:28 PM | Latur
लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी
