अमली पदार्थ नियंत्रण पथकानं लातूर जिल्ह्यात १७ कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. हे पथक गेल्या दोन दिवसांपासून अमली पदार्थ निर्मितीचं ठिकाण शोधत होतं. रोहिना गावात हे अमली पदार्थ तयार केले जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रक पथकानं पाच आरोपींना सोबत आणलं होतं. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तपास झाल्यानंतर परतत असताना एका आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी हा प्रयत्न उधळून लावला. सर्व आरोपींना मुंबईला नेलं असून तिथंच पुढील कारवाई होईल, असं लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितलं.