दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडी वाढली की, अमरावती जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या पाणवठ्यांवर विदेशी पक्ष्यांचं आगमन होतं. पण यावर्षी मात्र वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे हे परदेशी पाहुणे उशिरानं दाखल झाले आहेत. या स्थलांतरित पक्षांच्या आगमनानं पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह पसरला आहे. जिल्ह्यातल्या नल दमयंती जलाशय, भिवापूर तलाव, छत्री तलाव यासह अनेक ठिकाणी स्वर्गीय नर्तक, मुनिया, चक्रवाक, चतुरंग बदक, नीळ्या गालाचा वेडा राघू असे विविध विदेशी पक्षी दर्शन देत आहेत. हे पक्षी मार्च महिन्यापर्यंत भारतात मुक्काम करतील.
Site Admin | November 16, 2024 7:13 PM | Birds
अमरावती जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या पाणवठ्यांवर विदेशी पक्ष्यांचं उशिरानं आगमन
