गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती, वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रमुख ८ उद्योगांमधे उत्पादन ४ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढलं. त्यात कोळसा, तेलशुद्धिकरण, पोलाद, सिमेंट, वीज आणि खतं यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोळसा उद्योगात ७ पूर्णांक ८ दशांश, तेलशुद्धिकरण ५ पूर्णांक २ दशांश, स्टील मधे ४ पूर्णांक २ दशांश, सिमेंट ३ पूर्णांक ३ दशांश तर वीज निर्मिती उद्योगाच्या उत्पादनात ६ दशांश टक्क्यांनी वाढ झाली आहे.
देशाच्या परकीय चलन साठ्यात सलग आठव्या आठवड्यात घट झाली असून हा साठा १ अब्ज ३१ कोटी डॉलरनं घसरून ६५६ अब्ज ५८ कोटी डॉलर झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या आकडेवारीत दिली आहे.