डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर संकलन एक लाख ९५ हजार कोटी रुपयावर

जानेवारी २०२५ या महिन्यात एक लाख ९५ हजार कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला आहे. जानेवारी २०२४ च्या तुलनेत या महिन्यात कर महसूलात १२ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात केंद्राचं वस्तू आणि सेवा कर संकलन ३६ हजार ७७ कोटी रुपये आणि राज्याचं वस्तू आणि सेवा कर संकलन ४४ हजार ९४२ कोटी रुपये इतकं आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संकलन १ लाख कोटी रुपये तर उपकर संकलन १३ हजार ४१२ इतकं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा