डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस

महाराष्ट्रात आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. दोन्ही सभागृहांमधे आज प्रदीर्घ चर्चा झाली. 

राज्य सरकारने लोकांना कल्याण करण्यासाठी विविध लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यासाठी कर्ज घ्यावी लागली असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देत होते. मराठा आरक्षणावर विरोधिकांची भूमिका दुटप्पी आहे. आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे काँग्रेसचे लोक असल्याचा आरोप त्यांनी केला. 

मुंबईतील सर्व पुनर्विकासाची काम लवकर पूर्ण व्हावी यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. झोपडपट्ट्यांचा वरचा मजला विकसित करण्यासाठी क्लस्टर प्रमाणे लाभ देणार असल्याचं ते म्हणाले. मुंबई विमातळावरील गर्दी कमी करण्यासाठी पालघर जवळ मुंबई महानगर क्षेत्रातल्या तिसऱ्या विमानतळाच्या उभारणीची चाचपणी करत आहोत असं आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलं. 

अंमली पदार्थ, बेकायदा सुरू असलेली हॉटेल यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हे प्रकार बंद होत नाही तोपर्यंत कारवाई सुरू राहील असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा