नेपाळमध्ये भूस्खलन झाल्यामुळे दोन प्रवासी बस आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या नदीत वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण ६५ प्रवासी होते, यात ७ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. चितवन जिल्ह्यात नारायणघाट – मुगलिंग पट्ट्यात भूस्खलन झाल्यामुळे या बस त्रिशूली नदीत पडल्या. यातल्या बीरगंजहून काठमांडूला चाललेल्या बसमध्ये ७ भारतीय प्रवास करत होते. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलानं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केलं असून प्रधानमंत्री पुष्पकमल दहल यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश दिले आहेत.
Site Admin | July 12, 2024 1:41 PM | Bus | landslide | Nepal