जमिनीच्या मोबदल्यात नोकरी या मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. या प्रकरणी ईडीच्या अगोदर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
ईडीने १८ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने लालू यादव आणि इतरांना समन्स बजावलं होतं. २००४ ते २००९ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागातल्या नियुक्त्या या जमीनीच्या मोबदल्यात केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.