आर्क्टिक खुल्या ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचा चिनी तैपेई चा खेळाडू चौ तीन चेन ने २१-१९, १८-२१, १५-२१ असा पराभव केला आहे. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य च्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
महिला एकेरी सामन्यात भारताच्या उन्नती हुडा ला कॅनडाच्या मिशेल ली कडून १०-२१, १९- २१ असा , तर मालविका बन्सोडेला थायलंडच्या गतविजेत्या रोचनोक इंतानोन कडून १५-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागला होता.