‘सुना बेशा’ या सुवर्ण पेहरावातले भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक ओदिशात पुरी इथं लोटले आहेत. सुना बेशा हा उत्सव, सुवर्णालंकारांच्या प्रदर्शनासह ओदिशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण आध्यात्मिक उत्सव आहे. या तिघांचेही तीन स्वतंत्र रथ, २०८ किलोग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेले आहेत. त्यांची मावशी गुंडीचा देवी यांच्या घरचा ८ दिवसांचा पाहुणचार आटोपून. गुंडीचा मंदिरातून परतल्यानंतर, १२ व्या शतकातल्या श्री जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारा समोर हे रथ उभे केले जातात. ‘सुना बेशा’ साठी पुरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Site Admin | July 17, 2024 8:34 PM | 'Suna Besha' festival | Jagannath Puri