डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 10, 2024 7:18 PM

printer

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या सर्वांना ओवाळणी म्हणून दोन महिन्याचं अनुदान जमा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज केलेल्या सर्व बहिणींना येत्या १७ तारखेला ओवाळणी म्हणून दोन महिन्यांचं अनुदान खात्यात जमा करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या योजनेत जवळपास दीड  कोटी माहिलांनी अर्ज भरले आहेत, अजूनही अर्ज भरले जात आहेत. पुढच्या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे पैसे मिळतील. एकही पात्र बहीण वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शिंदे असा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार, प्रसार , साक्री उपजिल्हा रुग्णालयासह अन्य विकास कामांचं भूमीपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील भाडणे इथं हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. लाकडी बहीण योजना बहिणींचा अधिकार आहे, तो त्यांना मिळणारच. योजनेत कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घावी असे ते  जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले.

गेल्या २५ वर्षांपासून बंद पडलेला धुळे जिल्ह्यातील साक्री येथील पांझरा कान सहकारी साखर कारखाना आणि पं.दीनदयाळ आदिवासी सूत गिरणी सुरु करण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करू, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा