मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या एक कोटी चार लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरातून सुमारे एक हजार महिला मुख्यमंत्री शिंदे यांना ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी आल्या होत्या. महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे लाभार्थ्यांशिवाय अन्य कुणालाही काढता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कागदपत्रे आणि तांत्रिक कारणांमुळे ज्यांना निधी मिळाला नाही, त्या अडचणी दूर करून त्यांनाही लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेतल्या निधीची रक्कम वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उमेद अभियानातल्या महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | August 20, 2024 8:22 AM | CM Eknath Shinde
१ कोटी ४ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पहिल्या दोन हप्त्यांचा निधी जमा
