मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अधिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना कुटुंब भेट अभियानाची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कुंटुंबाना भेट देऊन महिलांच्या अडचणी आणि समस्या सोडवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाला धुळे शहर आणि जिल्ह्यात देखील सुरुवात झाली आहे. लेक लाडकी योजना,अन्नपूर्ण योजना, शिक्षण घेत असलेल्या मुलीनां मोफत उच्च शिक्षण योजना, वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना, कामगार योजना अशा शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आणि कुटुंबातल्या पात्र सदस्यांना या सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Site Admin | September 14, 2024 7:13 PM | Dhule
धुळ्यात लाडकी बहिण योजना कुटुंब भेट अभियानाला सुरूवात
